निवडणूक आयोगाच्या सूचनांचे काटेकोर अंमलबजावणी करा
निवडणूक निरीक्षक दिब्य प्रकाश गिरी यांच्या सूचना
पंढरपूर. 03:- पंढरपूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भारतीय निवडणूक आयोगाच्या सूचनांचे काटेकोर अंमलबजावणी होईल याकडे लक्ष द्यावे अशा सूचना निवडणूक निरीक्षक दिब्य प्रकाश गिरी यांनी आज येथे बैठकीत दिल्या.
पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूकीच्या तयारीचा श्री.गिरी यांनी आज आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी ह्या सूचना दिल्या. पंढरपूर उपविभागीय कार्यालयाच्या झालेल्या परिसरात झालेल्या या बैठकीस व्यासपीठावर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, अतिरिक्त पोलीस अधिक्षक अतूल झेंडे, भाउपजिल्हा निवडणूक अधिकारी भारत वाघमारे उपस्थित होते.
बैठकीस सुरवातीस श्री.गिरी यांनी नोडल अधिकारी यांनी केलेल्या तयारीची माहिती घेतली. विविध कामांसाठी नियुक्त करण्यात आलेल्या समन्वय अधिकारी यांनी आतापर्यंत केलेले काम आणि निवडणूक प्रक्रियेत केले जाणारे काम यांची माहिती दिली. समन्वय अधिकारीयांनी त्यांना नेमून दिलेल्या कामाबाबत नियोजन करावे. निवडणूक आयोगाच्या सूचनांचे आणि त्याचबरोबर कोरोना विषयक सूचनांचे काटेकोर पालन करा, अशा सूचना निरिक्षक दिब्य प्रकाश गिरी यांनी दिल्या.
सूक्ष्म निरीक्षकांनी चेकलिस्ट नूसार काम करावे.ईव्हीएम आणि मनुष्यबळ व्यवस्थापन याबाबत नियोजन करा. क्षेत्रीय अधिकारी, कर्मचारी यांनी कोरोना विषयक सूचना आणि नियमांचे पालन करावे. त्यासाठी सार्वजनी आरोग्य विभागाने पुरेशी तयारी करावी अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
विधानसभा पोट निवडणुकीसाठी सर्व नियुक्त अधिकारी कर्मचारी यांनी समन्वयाने काम करून निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडावी अशा सूचना जिल्हाधिकारी शंभरकर यांनी यावेळी दिल्या. यावेळी बैठकीस निवडणूक निर्णय अधिकारी गजानन गुरव, उपजिल्हाधिकारी अनिल कारंडे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सुशील बेल्हेकर, स्वप्नील रावडे यांच्यासह पंढरपूर विधानसभा पोट निवडणूकीसाठी नियुक्त जिल्हास्तरीय सर्व नोडल अधिकार तसेच सर्व क्षेत्रीय अधिकारी सूक्ष्म निरीक्षक उपस्थित होते.
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…
पंढरपूर–‘करिअर करत असताना अपयश आले तरी हरकत नाही, परंतू प्रयत्न मात्र सोडू नयेत. इंजिनिअरिंग पूर्ण…
श्री. पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अभियांत्रिकी महाविद्यालयातील तृतीय वर्षा मध्ये शिकत असणार्या…