२५२ पंढरपूर -मंगळवेढा विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने समाधान आवताडे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजापाचे सहयोगी आमदार प्रशांत परिचारक यांनी आज पंढरपूर शहरातील भाजपचे काही पदाधीकारी,नगरसेवक यांच्यासह शहरातील विविध भागातील आपल्या समर्थकांना या निवडणुकीसाठी अलर्ट मोडवर राहून कुठलाही हलगर्जीपणा न करता व गेल्या पाच -सहा वर्षाच्या कालावधीत आमदार प्रशांतराव परिचारक यांनी महायुतीच्या सत्ताकाळात शहरासाठी मंजूर करून आणलेल्या निधीची,पूर्ण करण्यात आलेय,प्रगतीपथावर असलेल्या तसेच लवकरच हाती घेण्यात येत असलेल्या विविध विकास कामांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवा,प्रत्येक मतदारांशी वैयक्तिक संपर्क साधा आणि त्यांना आपली भूमिका पटवून द्या,मागील निवडणुकीत आपण शहरातील काही बुथवर मागे राहिलो त्याची कारणे जाणून घेत समस्या ऐकून त्याना आश्वस्त करा,पक्षाने आपल्यावर मोठ्या विश्वासाने जबाबदारी टाकली आहे आपण ती तितक्याच जबाबदारीने पार पाडली पाहिजे अशा सुचना नगरसेवक,विविध पदाधिकारी,जेष्ठ समर्थक यांना देत असल्याची माहिती विश्वासनीय सूत्रांकडून मिळाली आहे.
आज आमदार प्रशांत परिचारक यांनी शहरातील इसबावी या सर्वात मोठ्या उपनगरात माजी नगरसेवक गणेश अधटराव,नगरसेवक विशाल मलपे, सचिन शिंदे, इरफान मुजावर, सुनिल ढोले,उमेश जाधव,नागेश सूर्यवंशी, नितीन घंटे, शशिकांत म्हत्रे, निखिल सूर्यवंशी, भागवत कुंभार, विकी अभंगराव, प्रकाश मगर,किरण खडाखडे ,वैभव परचंडे, महेश कुलकर्णी,यांच्यासह या भागातील अनेक प्रमुख परिचारक सर्मथक पदाधिकारी व जेष्ठ कार्यकर्त्याची बैठक घेऊन या भागातून भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांना जास्तीत जास्त मताधिक्य मिळवून देण्यासाठी या परिसरातील मतदारांशी जास्तीत जास्त संपर्क आणि संवाद साधत दक्ष राहण्याच्या सूचना दिल्या.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…