ताज्याघडामोडी

उमेदवारांच्या खर्चावर काटेकोर लक्ष ठेवा निरीक्षक शिल्पी सिन्हा यांच्या सूचना

उमेदवारांच्या खर्चावर काटेकोर लक्ष ठेवा

निरीक्षक शिल्पी सिन्हा यांच्या सूचना

                   पंढरपूर. १ :-  पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने खर्चाची मर्यादा घालून दिली आहे. या मर्यादेतच प्रत्येक उमेदवारांनी खर्च करणे अपेक्षित आहे. उमेदवारांच्या निवडणूक खर्चावर बारीक नजर ठेवा अशा, सूचना निडणूक खर्च निरिक्षक श्रीमती शिल्पी सिन्हा यांनी आज दिल्या.

                   पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी  यांच्या कार्यालयात उमेदवारांच्या निवडणूक खर्चाबाबत आढावा  घेण्यात आला. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांतधिकारी गजानन गुरव, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार सुशिल बेल्हेकर,  निवडणूक सनियंत्रण कक्षाचे संजय सदावर्ते, सचिन माने उपस्थित होते

                   श्रीमती सिन्हा बैठकीत यांनी सूचना दिल्या की,  उमेदवारांकडून प्रचारासाठी विविध माध्यमाचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे वृत्तपत्र, तसेच इतर माध्यमांचा जाहिरात तपशीलाची माहिती संबंधित पथकाने दररोज घ्यावी. सभा आणि मोर्चाच्या ठिकाणी व्हिडीओ सर्वेक्षण पथक, व्हिडीओ पाहणी पथक कार्यरत ठेवावे. यासंबधीची सर्व माहिती खर्च विषयक नोडल अधिकारी यांच्याकडे सादर करावी. संशियत वाहनांची तपासणी व पैशाचा गैरवापर याबाबत भरारी पथकाने दक्षता घ्यावी. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशाचे पालन करुन निवडणूक प्रक्रिया पार पाडावी तसेच  निवडणूक विभागाच्या सर्व  पथक प्रमुखांनी  निवडणूक कालावधीत सतर्क रहावे. उमेदवारांनी निवडणूक खर्च  वेळेत खर्च नियंत्रण विभागाकडे सादर करावा.  

                   श्रीमती सिन्हा यांनी निवडणूक नियंत्रण कक्षास भेट देवून कामाकाज विषयक समाधान व्यक्त केले. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी गुरव यांनी निवडणूक बाबत तयारीची सर्व माहिती दिली. तत्पुर्वी  शासकीय विश्रामगृह पंढरपूर येथे उमेदवारांच्या खर्चाबाबत विविध निवडणूक विभागाचे पथक प्रमुख यांचाही आढावा घेण्यात आला.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय कोर्टी, पंढरपूर मध्ये अभियंता दिन उत्साहात

इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…

6 days ago

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

1 week ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

1 week ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

3 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

3 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

3 weeks ago