स्वेरी कॉलेजच्या स्टुडंट ब्रँचला मिळाली तीन हजार डॉलरची ग्रँट
पंढरपूर- अमेरिकन सोसायटी ऑफ हिटिंग रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनींग च्या अंडर ग्रॅज्युएट प्रोग्राम एक्युपमेंट ग्रँट्स च्या अंतर्गत दरवर्षी रिसर्च कामांसाठी निधी दिला जातो. त्यासाठी जगभरातून अर्ज मागविले जातात. स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरींगमध्ये सन २०१९ पासून अॅश्रे स्टुडंट ब्रँच अस्तित्वात आहे. त्या अंतर्गत मुलांना रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनींग इंडस्ट्री बद्दल माहिती दिली जाते, इंडस्ट्री व्हिजीट आयोजित करण्यात व अॅश्रे च्या वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये विद्यार्थी सक्रिय सहभाग घेतात. स्वेरीच्या अॅश्रे स्टुडंट ब्रँचने ह्यावर्षी ‘ परफॉर्मन्स अॅनालिसिस ऑफ सोलार पॉवर्ड कोल्ड रूम (एसपीसीआर) सिस्टम वुईथ फेज चेंज मटेरिअल्स (पीसीएम)’ हे प्रपोजल दाखल केले होते. त्याला अॅश्रेकडून तब्बल तीन हजार डॉलरची ग्रँट मिळाल्याची माहिती या विभागाचे प्रमुख प्रा. दिग्विजय रोंगे यांनी दिली. अशी ग्रँट मिळवणारे स्वेरी हे जगभरातील निवडक महाविद्यालयांपैकी एक तर अॅश्रे पुणे चॅप्टर मधील एकमेव महाविद्यालय ठरले आहे.
या प्रकल्पासाठी संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. अॅश्रे पुणे चॅप्टरचे प्रमुख प्रविण साळुंखे व स्टुडंट अॅक्टिव्हिटी चेअर प्रा. कमलनाथ घोष यांनी प्रकल्पाच्या प्रस्तावासाठी सहकार्य केले. अॅश्रेच्या विविध उपक्रमात सहभाग घेण्यासाठी महाविद्यालयाचे प्रशासन अधिष्ठाता प्रा. सचिन गवळी व अॅश्रे फेलो सुहास देशपांडे यांनी वेळोवेळी प्रोत्साहन दिले. या प्रकल्पामधून सोलार उर्जेवर चालणारं एक कोल्ड रूम बनवण्यात येणार आहे. उर्जेचा अतिरिक्त भार कमी करण्यासाठी त्यामधे फेज चेंज मटेरियल (पीसीएम) चा वापर करण्यात येईल. अशा रीतीने ग्रीड चा कमीत कमी वापर व अपारंपरिक ऊर्जा स्तोत्रांचा जास्त वापर करून पैशाची बचत करता येईल. अशा कोल्ड रूमचा शेतमाल, नाशवंत फळे व भाज्यांची साठवण व वाहतूक करण्यास फायदा होणार आहे. शेतकरी पाहिजे तेव्हा त्यातील माल काढून विक्री करू शकतील व भाज्यांच्या नाशवंतपणामुळे होणारे नुकसान देखील वाचवू शकतील. या प्रकल्पाचा कालावधी एक वर्षाचा असून त्यातून संशोधक विद्यार्थ्यांना सक्रिय सहभाग घेण्यास प्रोत्साहित केले जाईल. भविष्य काळात कोल्ड स्टोरेजचा वापर वाढणार असून ह्या क्षेत्रात रोजगाराच्या तसेच व्यवसायाच्या भरपूर संधी निर्माण होणार असल्याचे संशोधक प्रा. दिग्विजय रोंगे यांनी नमुद केले. तीन हजार डॉलरची ग्रँट मिळाल्यामुळे प्रा. दिग्विजय रोंगे यांचे स्वेरीचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे, संस्थेचे अध्यक्ष नामदेव कागदे, उपाध्यक्ष अशोक भोसले तसेच संस्थेचे पदाधिकारी व विश्वस्त, कॅम्पस इन्चार्ज, स्वेरी अंतर्गत असलेल्या इतर महाविद्यालयांचे प्राचार्य, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थ्यी व पालकांनी अभिनंदन केले.