राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार सध्या आजारी आहेत. त्यांच्यावर शस्त्रक्रियेची गरज असल्याने त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. पवार साहेब तिथे उपचार घेत असून, सर्व उपचारांना ते अतिशय उत्तम प्रकारे प्रतिसाद देत आहेत. शरद पवार यांच्या आजारपणाची बातमी बाहेर आली आणि समाजातील प्रत्येक घटकांतून त्यांच्याप्रती काळजीचे सूर बाहेर पडले.मात्र काही विकृत प्रवृत्तींनी शरद पवारांच्या आजारपणाबाबत अतिशय विकृत आणि हीन दर्जाच्या पोस्ट्सही सोशल मीडियावर पोस्ट करत आहेत . काहींनी तर शरद पवार यांच्या मृत्यूची आशा करत आपली विकृती समाजासमोर ठेवली.” अशी चिंता मेहबूब शेख यांनी व्यक्त केली.
गेली 50 वर्ष या राज्याचा भार समर्थपणे वाहणाऱ्या आणि आमच्यासाठी आमचा मान, स्वाभिमान असणाऱ्या साहेबांवर केलेली ही टीका अतिशय जिव्हारी लागणारी होती. परिणामी मी आणि माझ्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या सहकाऱ्यांनी या विकृत आणि समाजकंटक लोकांना अद्दल घडवण्याचे ठरवले आहे. त्याचाच भाग म्हणून आम्ही मुंबई येथे शरद पवारांविरोधात विकृत लिखाण करणाऱ्या लोकांविरोधात सायबर क्राईमचे एसपी शिंत्रे यांची भेट घेऊन कलम 153 अ, 505(2), 500, 504, 469, 499, 507, 35, आयटी कलम 66(D) नुसार सायबर क्राईमला गुन्हे दाखल केले आहेत.” अशी माहिती शेख यांनी दिली.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…