पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोट निवडणूक मध्ये शैलाताई गोडसे यांनी आपला अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केल्यानंतर शैलाताई गोडसे यांचा झंजावती प्रचार दौरा सुरू झाला आहे. ग्रामीण भागातील प्रचार दौरा करीत करीत शैलाताई गोडसे यांनी आज पंढरपूर शहरातील इसबावी भागांमधील मतदार बंधू भगिनींच्या भेटीगाठी घेत आहेत. इसबावी भागातील महिला मतदार या सौ शैलाताई गोडसे यांचे उत्साहाने स्वागत करीत होत्या. आपण या निवडणुकीतून माघार घेऊ नका असे आवर्जून या भागातील महिला शैला ताईंना सांगत असताना दिसून येत होते.
सौ शैलाताई गोडसे यांनी आपल्या प्रचार फेरीत मतदारांशी संवाद साधत मतदारांचे मनोगत जाणून घेऊन जनतेचे जिव्हाळ्याचे प्रश्न ,इसबावी परिसरांमधील रखडलेली विकास कामे पूर्णत्वास नेण्याचे अभिवचन देऊन “फक्त एक वेळ विधानसभेसाठी संधी द्या” संपूर्ण मतदार संघाचा सर्वांगीण विकास तसेच बेरोजगारांच्या हाताला एमआयडीसीच्या माध्यमातून काम मिळवून देण्याचे व महिला भगिनींना आर्थिक बळ मिळावे. म्हणून लघु उद्योगास चालना देण्याचे आश्वासन शैलाताई गोडसे यांनी दिले.
वाखरी इसबावी या भागांमधील महिला मतदारांनी प्रचंड उत्साहात सौ.शैला ताई गोडसे यांचे घरोघरी स्वागत करण्यात आले. वयोवृद्ध ज्येष्ठ वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घेत शैलाताई गोडसे यांनी इसबावी परिसरामध्ये आपला प्रचार दौरा आज सुरू केला. महिलांचा तसेच पुरुष मतदारांचा सौ.शैला ताईच्या उमेदवारीस पाठिंबा मिळत आहे. आज संपूर्ण परिसरामध्ये घरोघरी एकच चर्चा “शैलाताई ,”शैलाताई “असे वातावरण इसबावी परिसरात आज दिसून आले.
इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…