२५२ पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यास आता केवळ दोन दिवसाचा कालावधी बाकी असतानाच ज्या परिचारक गटाचे नेते म्हणून नागेश भोसले हे ओळखले जातात त्या परिचारक गटाने भाजपा पक्षश्रेष्ठी देतील तो निर्णय मान्य करणार असल्याची भूमिका या गटाचे नेते आ.प्रशांत परिचारक यांनी जाहीर केली आहे.मात्र याच वेळी परिचारक गटाचे खंदे समर्थक आणि माजी उपनगराध्यक्ष राहिलेले व तसेच गेल्या सात वर्षांपासून पंढरपूर नगर पालिकेचे नगराध्यक्षपद आपल्या कुटूंबात ठेवण्यात यशस्वी ठरलेले नागेश भोसले यांनी पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज खरेदी केला खरा पण ते हि निवडणूक लढविणार का याकडे भाजपा आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्ष समर्थकांचे लक्ष लागले आहे.
पंढरपूर नगर पालिकेवर असलेल्या वर्चस्वामुळे जननायक अशी प्रतिमा निर्माण करण्यात नागेश भोसले हे यशस्वी ठरले आहेत.मराठा आरक्षण आंदोलन असो कि पंढरपूर शहरातील काही छोट्या मोठ्या सामाजिक कार्यकर्त्याचे आंदोलन अथवा उपोषण त्यावर ”यशस्वी तोडगा” काढत नागेश भोसले यांनी शहरात आपली वेगळी प्रतिमा निर्माण केली आहे.२०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळी परिचारक उमेदवार नसतील तर आपण तयार आहे अशीच भूमिका नागेश भोसले यांनी घेतल्याची चर्चा होती.नागेश भोसले यांच्या सुविध्य पत्नी साधना भोसले यांच्या नगराध्यक्ष पदाच्या गेल्या ७ वर्षाच्या कालावधीत पंढरपूर शहरात आमदार प्रशांत परिचारक यांच्या दूरदृष्टीतून अनेक विकास कामे हाती घेण्यात आली आणि हि विकास कामे नगराध्यक्षा साधना भोसले यांच्या कार्यकाळात पूर्णत्वास नेली गेली त्याचा फायदा नागेश भोसले यांनी विधानसभा निवडणूक लढविली तर होईल अशी शक्यता वर्तविली जात असतानाच शहरातील नगर पालिकेच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये खर्चून करण्यात आलोली विकास कामे निकृष्ट दर्जाची होत असल्याच्या नाराजीसही नगर पालिकेत सत्तेत असलेल्या भाजपा व पंढरपूर – मंगळवेढा विकास आघाडीच्या नगरसेवकांना सामोरे जावे लागल्याचे दिसून आले आहे . आता भाजपाकडून समाधान आवताडे हे उमेदवार असणार आहेत आणि पक्षाचा आदेश मानत पंढरपुर शहर तालुक्यातून भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांना मताधिक्य मिळवून देण्याची जबाबदारी आ.प्रशांत परिचारक आणि शहरातील परिचारक सर्मथक नगरसेवक व प्रमुख कार्यकर्ते यांच्यावर राहणार आहे.२०१९ च्या निवडणुकीत कुठल्या प्रभागातून स्व.सुधाकरपंत हे उमेदवार असतानाही मताधिक्य मिळाले नव्हते याचा परिपूर्ण अभ्यास परिचारकांनी केला आहे.त्यामुळे या पोटनिवडणुकीत नागेश भोसले हे स्वतंत्र उमेदवारी दाखल करणार का याकडे परिचारक,आवताडे आणि भालके गटाच्या सर्मथकांसह पंढरपूर शहरातील सर्वसामान्य मतदारांचे लक्ष लागले आहे.
नागेश भोसले हे कट्टर परिचारक सर्मथक म्हणून ओळखले जातात.त्यांनी पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज खरेदी केला असला तरी ते आमदार प्रशांत परिचारक आणि भाजपच्या निर्णयाच्या विसंगत भूमिका घेणार नाहीत.जर भाजपाकडून परिचारक उमेदवार नसतील तर आपण विधानसभा निवडणूक लढवू असा निर्धार ते २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या पूर्वीपासून व्यक्त करत आले आहेत त्यामुळे त्यांनी उमेदवारी अर्ज घेतला असला तरी ते पक्षविरोधी भूमिका घेणार नाहीत अशीच शक्यता परिचारक समर्थक व्यक्त करताना दिसून येत आहेत.
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…
पंढरपूर–‘करिअर करत असताना अपयश आले तरी हरकत नाही, परंतू प्रयत्न मात्र सोडू नयेत. इंजिनिअरिंग पूर्ण…
श्री. पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अभियांत्रिकी महाविद्यालयातील तृतीय वर्षा मध्ये शिकत असणार्या…