ताज्याघडामोडी

फॅबटेक पब्लिक स्कूलमध्ये शिक्षक दिन उत्साहात साजरा

सांगोला: फॅबटेक एज्युकेशन सोसायटी पुणे संचलित,फॅबटेक पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये 5 सप्टेंबर रोजी  शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. भारताचे पहिले उपराष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या स्मृती प्रित्यर्थ सन्मान करण्यासाठी आणि आपल्या जीवनात शिक्षकांचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी शिक्षक दिन साजरा केला जातो. यावेळी  प्राचार्य  सिकंदर पाटील, वनिता बाबर, शितल बिडवे यांच्या हस्ते सरस्वती पूजन  व श्री. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. 4 सप्टेंबर या दिवशी  विद्यार्थ्यांनी शिक्षकांचे वर्गावरील तास घेऊन शिक्षकांबद्दल आपला आदर व्यक्त केला. या कार्यक्रमासाठी इयत्ता नववीतील विद्यार्थिनी कु. रिया कुमठेकर व कु. सुप्रिया पवार या दोघींनी सूत्रसंचालन केले तर कु. प्राप्ती आलदर व शुभम लाडे यांनी शिक्षक दिनाविषयी  मनोगत व्यक्त केले,तर पवार सुप्रिया व प्राप्ती आलदर यांनी शिक्षकांसाठी  क्विझ कॉम्पिटिशन व जादूई प्रयोग घेतले.    आठवीतील विद्यार्थिनी कु. पूर्वा दौंडे हिने आभार व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी श्री. पंचाक्षरी स्वामी श्री. समाधान खांडेकर, मिस.  वनिता बाबर,मिस. शितल बिडवे  यांचे विशेष सहकार्य लाभले. शिक्षक दिनानिमित्त संस्थेचे चेअरमन व मॅनेजिंग डायरेक्टर  मा.श्री. भाऊसाहेब रुपनर यांनी शिक्षकांना शुभेच्छा दिल्या. तसेच संचालक प्रा. अमित रुपनर, संचालक श्री. दिनेश रूपनर, संचालिका सौ. सारिका रुपनर, कॅम्पस डायरेक्टर श्री. संजय अदाटे यांनीही शिक्षकांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

5 years ago

भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याच्या हत्येचा कट उघडकीस

भाजपचे नगरसेवक व माजी सभागृह नेते धीरज घाटे यांच्या हत्येचा कट उघडकीस आला आहे. याप्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात विकी उर्फ…

5 years ago

तलाठ्याचा मदतनीस लाच घेताना रंगेहात पकडला पंढरपूर तालुक्यातील घटनेने महसूल विभागात खळबळ

तलाठ्याचा मदतनीस लाच घेताना रंगेहात पकडला पंढरपूर तालुक्यातील घटनेने महसूल विभागात खळबळ पंढरपूर (प्रतिनिधी) ः पंढरपूर तालुक्यातील शेळवे गावच्या तलाठ्याकडे…

5 years ago

फॅबटेक कॉलेजच्या डी.फार्म प्रथम व द्वितीय वर्षाचा निकाल १०० टक्के

महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ, मुंबई यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या  परीक्षेत फॅबटेक कॉलेजच्या डी. फार्मसीच्या प्रथम व द्वितीय वर्षाचा निकाल १०० टक्के लागला  असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय बैस यांनी दिली.  फॅबटेक टेक्निकल कॅम्पसमध्ये शै.वर्ष  २०१९-२० पासून नव्याने सुरु करण्यात आलेल्या डी.फार्म व बी.फार्म या विद्या शाखेच्या विद्यार्थ्यांनी  यशस्वी निकालाची उज्वल परंपरा कायम ठेवली आहे. या निकालामध्ये प्रथम वर्ष  कु.यळसंगी मीनाक्षी ही विद्यार्थिनी ८१.५५ %  गुणांसह प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. कु.धनश्री जाधव ८१.०० %  गुणांसह द्वितीय  क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे.तर कु. सुप्रिया काशीद ८०.६४ % गुणांसह तृतीय क्रमांकाने उत्तीर्णझाली आहे. द्वितीय वर्ष निकालामध्ये सचिन हट्टाळी ८९.५० %  प्रथम  क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे.  कु.रेश्मा शिंदे  ८९.४० %  गुणांसह द्वितीय  क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. तर कु.निकिता  होटगी ८८.०० % गुणांसह तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे.या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन व मॅनेजिंग डायरेक्टर मा. श्री.भाऊसाहेब रुपनर, संचालक प्रा.अमित रुपनर, संचालक श्री. दिनेश रुपनर,कॅम्पस डायरेक्टर श्री. संजय अदाटे  यांनी अभिनंदन केले. मा. श्री. भाऊसाहेब रुपनर यांच्या मार्गदर्शनाखाली व कॅम्पस डायरेक्टर श्री. संजय अदाटे यांनी विद्यार्थ्यांसाठी  ऑनलाईन प्लॅटफॉर्म व इतर सोयी- सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे सर्व प्राध्यापकांनी ऑनलाईन लेक्चरर्स तसेच प्रॅक्टिकलचे  व्हिडिओज बनवून विद्यार्थ्यांना त्यांच्या लॉगिन आयडीवर उपलब्ध करून देण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल समजण्यास सोपे गेले आहे. तसेच ग्रंथालयाच्या माध्यमातून आठवड्यातून दोन दिवस विद्यार्थ्यांना पुस्तके पुरवण्यात आली. याबरोबरच पीडीएफ स्वरूपात जर्नल्स व पुस्तके देखील त्यांना उपलब्ध करून देण्यात आली होती असे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय बैस यांनी सांगितले.  महाविद्यालयास पीसीआयची अंतिम मान्यता  नुकतीच मिळाली आहे. हि मान्यता भेटल्यानंतर विद्यार्थ्यांना फार्मसी स्टोअर करीता नोंदणी करता येते व सरकारी नोकरी मिळण्यास ते पात्र होतात. यामुळे नवीन प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा कल विशेषतःजिल्हा व जिल्ह्याबाहेरून हा फॅबटेक कॉलेज ऑफ फार्मसी कडे आहे. विद्यार्थ्यांच्या या यशात प्रा. सर्फराज काझी, प्रा. सूरज कांबळे, प्रा.सुरज मणेरी, प्रा.मिस. प्रियांका कारंडे, प्रा. मिस अश्विनी झाडे, प्रा.मिस.मोना तांबोळी, प्रा. मिस. गोपिका डोंगरे  यांचे मार्गदर्शन लाभले.

5 years ago

ईडीच्या कारवायांवरून शरद पवार यांचा केंद्र सरकारला सज्जड इशारा

'ईडी'कडून नाहक त्रास देण्याचं काम सध्या राज्यात सुरू आहे. याआधी ईडीच्या कारवाया तुम्ही कधी पाहिल्या होत्या का? असा सवाल उपस्थित…

5 years ago

‘तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर ‘या’ पाच जिल्ह्यांनी सतर्क रहावं’ – आरोग्यमंत्री राजेश टोपे

आरोग्यमंत्री राजेश टोपे पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. राजेश टोपे यांनी चाकणमधील एका खासगी रुग्णालयाला भेट दिली. आरोग्यमंत्र्यांनी यावेळी पत्रकारांशी संवाद साधला.…

5 years ago

धक्कादायक ! दोन वर्षांपूर्वी थाटामाटात केलेल्या प्रेमविवाहाचा तलाठ्याने असा केला दुर्दैवी अंत.

जुन्नर येथे तलाठी असणाऱ्या पतीने झोपलेल्या पत्नीच्या डोक्यात हातोडा मारून तसेच चाकूने वार करून निर्घृण खून केला. मोशीतील बोऱ्हाडेवस्ती परिसरात…

5 years ago

मोठी बातमी! Covishield चा दुसरा डोस 4 आठवड्यात घेण्याची परवानगी द्या; कोर्टानेच दिला आदेश

ज्या नागरिकांना कोव्हिशिल्ड लसीचा दुसरा डोस 4 आठवड्यांनंतर इच्छा असेल, त्यांना तो उपलब्ध करून देण्यात यावा, असे आदेश केरळ उच्च…

5 years ago

शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात आज महाराष्ट्राला हादरवून सोडणारी घटना

शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात आज महाराष्ट्राला हादरवून सोडणारी घटना घटना घडली आहे. एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर पाच…

5 years ago

खऱ्या बापाची औलाद असेल तर आरोप सिद्ध करावेत अन्यथा अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार

भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपसमितीबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र लिहल्यानंतर नामदार विजय वडेट्टीवार यांनी पडळकर हे नवीन गवत आहे अशी टीका…

5 years ago