Uncategorized

फॅबटेक टेक्निकल कॅम्पसमध्ये जागतिक मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त व्याख्यानाचे आयोजन

सांगोला: दि.१४ जानेवारी ते २८ जानेवारी  महाराष्ट्र शासनाने जागतिक मराठी भाषा संवर्धन पंधरवडा घोषित केला आहे. याचे औचित्य साधून फॅबटेक टेक्निकल कॅम्पसच्या अभियांत्रिकी, पॉलिटेक्निक, फार्मसी, या सर्व विद्याशाखेमध्ये  जागतिक मराठी भाषा संवर्धन पंधरवडा  साजरा करण्यात आला. या  कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुणे प्रा. सुनील नष्टे यांच्या हस्ते विद्देची देवता सरस्वती यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली. या कार्यक्रमासाठी  प्रा. सुनील नष्टे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यांचा सत्कार फार्मसीचे प्राचार्य डॉ. संजय बैस यांच्या हस्ते करण्यात आला.       मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त बोलताना प्रा. सुनील नष्टे म्हणाले कि,  भाषा ही संस्कृतिवाहक आहे. ग्रामीण भाषा ही जोपासली पाहिजे. आपल्या मराठी संस्कृतीचे संवर्धन केले पाहिजे, विद्यार्थांनी आपल्या शैक्षणिक पदवीबरोबरच चांगुलपणाचेही सर्टिफिकेट मिळवले पाहिजे. माता, माती, आणि मातृभाषा हे तीन घटक आपल्या जीवनात खूप महत्वाचे आहेत. मराठी भाषेमध्ये सर्वात महत्वाचा भाग म्हणजे भावना आहे. विद्यार्थांनी मराठी पुस्तके वाचली पाहिजेत, कसे जगावे हे मराठी भाषा शिकविते, जगण्यातले सौन्दर्य मराठी भाषा शिकविते. असे त्यांनी यावेळी सांगितले. प्रत्येकाने स्वभाषीक असावे, माणसाने माणूसपण जपले पाहिजे.प्रत्येकाने मराठी भाषेबद्दल आदर बाळगला पाहिजे. जगातील सर्वात सुंदर भाषा हि मराठी आहे, कारण मराठीच्या प्रत्येक शब्दाचे अनेक अर्थ होतात. दोन मने जोडण्याची ताकत मराठीमध्ये आहे. मराठी भाषेत भावनेचा ओलावा असतो. मराठी भाषेचे सार व महत्व त्यांनी यावेळी  विशद केले.    या कार्यक्रमाचे आयोजन ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने करण्यात आले होते.  हा कार्यक्रम कोविड १९ च्या प्रादुर्भावामुळे सर्व शासकीय नियमांचे पालन करून यशस्वीपणे पार पाडण्यात आला. हा  कार्यक्रम संस्थेचे चेअरमन मा.श्री. भाऊसाहेब रुपनर,संचालक श्री. दिनेश रुपनर  व कॅम्पस डायरेक्टर श्री. संजय अदाटे यांच्या मार्गदर्शनाखाली व  अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. आर. बी शेंडगे, पॉलिटेक्निकचे प्राचार्य प्रा. शरद पवार, फार्मसीचे प्राचार्य डॉ. संजय बैस, अकॅडमिक डीन प्रा. टी. एन.जगताप, कार्यक्रमाचे समन्वयक  प्रा. संगीता खंडागळे यांच्या उपस्थितीत पार पडला. या कार्यक्रमासाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.या  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समन्वयक  प्रा. संगीता खंडागळे यांनी  केले.

5 years ago

पंढरपूर सिंहगड मध्ये “शाकाहार व व्यसनमुक्ती” याविषयावर श्रीरंग बागल यांचे व्याख्यान संपन्न

कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस. के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयात शुक्रवार दिनांक २८ जानेवारी २०२२ रोजी रोटरी क्लब पंढरपूर व…

5 years ago

पंढरपूर व परिसराचा विकास साधनार्‍या संशोधनावर भर : रोहन परिचारक

कर्मयोगी अभियांत्रिकी महाविद्यालय आणि पुणे स्थित भारतातील अग्रगण्य “सेंटर फॉर ऍडव्हान्सड स्टडिझ इन पॉलिसी रिसर्च” (कॅस्पर) या संस्थेमध्ये सामंजस्य करार…

5 years ago

कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर प्रशालेत “७३ वा प्रजासत्ताक दिन” साजरा

बुधवार, दि.२६ जानेवारी २०२२ रोजी कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर येथे “७३ वा प्रजासत्ताक दिन” कोरोनाचे सर्व नियम पाळून साजरा करण्यात आला.…

5 years ago

युटोपियन शुगर कामगारांना देणार १२ टक्के पगारवाढ,गाळप क्षमताही वाढविली जाणार

युटोपियन शुगर्स लि. येथे  भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 73 व्या वर्धापन दिन कार्यक्रमात परिचारक बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन…

5 years ago

जैन धर्म तीर्थ श्री सम्मेद शिखरजी याचे पावित्र्य राखण्यासाठी केंद्र सरकारने पावले उचलावीत

जैन धर्म तीर्थ श्री सम्मेद शिखरजी याचे पावित्र्य राखण्यासाठी केंद्र सरकारला विनंती करण्याची मागणी सकल जैन समाज व भारतीय जनता…

5 years ago

बाय बाय मित्रानो ! स्टेट्स ठेवत महाविद्यालयीन तरुणाने घेतला जगाचा निरोप

औरंगाबाद जिल्ह्यातील बाजारसावंगी भागातील ताजनापूर येथे मनाला चटका लावणारी घटना समोर आली आहे. मित्रांसाठी बाय बाय स्टेटस ठेवत महाविद्यालयीन विद्यार्थ्याने…

5 years ago

स्वेरीचे माजी विद्यार्थी डॉ. सुधीर सिंदगी यांना आंतरराष्ट्रीय परिषदेत भारताचे नेतृत्व करण्याचा बहुमान

भारत सरकारच्या नौवहन महासंचालनालयाने आंतरराष्ट्रीय सागरी संघटनेच्या बैठकीमध्ये जहाज डिझाईन आणि बांधकाम समितीसाठी तज्ञ भारतीय प्रतिनिधी म्हणून स्वेरीचे माजी विद्यार्थी…

5 years ago

पंढरपूरात कार शोरूम मध्ये वैतागलेल्या कार मालकाने केली तोडफोड

पंढरपूर शहरानजीक असलेल्या वाखरी हद्दीत रेनॉल्ट कार कंपनीचे शोरुम असून दिनांक २० जानेवारी २०२२ रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास रेनल्ट क्वीड…

5 years ago

सरकोली पोस्ट ऑफिस मध्ये सुकन्या समृद्धी योजनेतील रकमेवर तत्कालीन डाकपालाचा डल्ला

सरकोली शाखा डाकघर येथील श्री महेशकुमार चंद्रकांत भोसले रा सरकोली ता पंढरपूर यांनी त्यांचे सुकन्या समृद्धी खाते पुस्तक क्रमांक पंढरपूर…

5 years ago